July 27, 2024 Saturday
July 27, 2024 Saturday
Home » Economy » Finance » एटीएममधून पैसे काढणे होणार आणखी महाग
a
Withdrawing money from ATMs will be even more expensive

एटीएममधून पैसे काढणे होणार आणखी महाग

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढताना मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या शुल्काशी संबंधित नियमात रिझर्व्ह बँकेने बदल केला. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे येत्या जानेवारीपासून

किंचितसे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकांच्या इंटरचेंज शुल्कात वाढ झाली आहे तसेच सामान्य खर्चही वाढला आहे. याची भरपाई करण्यासाठी बँका एटीएम व्यवहारावर आकारत असलेले शुल्क वाढवून २१ रुपये करणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. सध्या हे शुल्क २० रुपये आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एटीएम स्थापनेचा खर्च वाढला आहे. तसेच एटीएमच्या देखभाल खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, जून २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काच्या आढाव्यासाठी एक समिती स्थापन केली होती. इंडियन बैंक्स असोसिएशनचे चेअरमन या समितीचे अध्यक्ष होते. या समितीच्या शिफारशींनुसार रिझर्व्ह बँकेने बँकाना एटीएमच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. तो खर्च ग्राहकांना पडेल.

  • रिझर्व्ह बँकेने अलीकडेच बँकांच्या इंटरचेंज शुल्कात वाढ केली होती. वित्तीय व्यवहारांचे इंटरचेंज शुल्क १५ रुपयावरुन १७रुपये, तर बिग-वित्तीय व्यवहाराचे इंटरचेंज शुल्क ५रुपयावरून रुपये करण्यात आले आहे.१ ऑगस्ट २०२१ रोजी हे नवे दर लागू झाले.
  • बैंक ग्राहकाचे ज्या बँकेत खाते आहे. त्याच बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वित्तीय व बिगर-वित्तीय व्यवहार मोफत करता येतात. त्याचवेळी इतर बँकांच्या एटीएमधून मेट्रो शहरात तीनवेळा आणि बिगर-मेट्रो शहरात पाचवेळा मोफत पैसे काढता येतात. त्यावरच्या व्यवहारासाठी बँका शुल्क आकारू शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता अधिक झळ बसणार आहे.
Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top