प्रतिनिधी : संतोष गोरे, ठाणे जिल्हा
मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे आणि परिवहन विभागाचा आकृतिबंध तयार करण्याच्या मागणीबाबत आता शासनस्तरावरील कार्यवाहीकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
१९ जानेवारी २०२६ रोजीच्या नगरविकास विभागाशी संबंधित पत्राच्या अनुषंगाने महानगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव कधी पाठवणार, तसेच या प्रस्तावावर पुढील कार्यवाही कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आकृतिबंधाचा प्रश्न आणि कंत्राटी कामगारांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लागणार कधी? महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावाची सद्यस्थिती, शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे किंवा नाही आणि पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे.
वर्षानुवर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर संबंधित नियम व शासन निर्णयांच्या आधारे निर्णयप्रक्रिया पुढे जावी आणि कामगारांना त्यांच्या प्रश्नांबाबत स्पष्ट उत्तर मिळावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता सर्वांचे लक्ष महानगरपालिका प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे. प्रस्ताव शासन दरबारी कधी पोहोचणार आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर निर्णय कधी होणार, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.











