June 6, 2026 Saturday
June 6, 2026 Saturday
Home » Human Rights News » RTI News » भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत
a

भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत

‘आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन’चा एल्गार

मुंबई प्रतिनिधी :

माहितीचा अधिकार (RTI) आणि मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे, मानसिक छळ, तसेच प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि माहिती मिळविण्यात येणारे अडथळे याविरोधात आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन यांच्या वतीने “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.

या जनआंदोलनाच्या माध्यमातून RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न, मानवाधिकार संरक्षण, माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासनातील पारदर्शकता तसेच भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी, राष्ट्रीय सचिव श्री. बसंत चक्रवर्ती, मुंबई अध्यक्ष श्री. सचिन खरात व मुंबई सचिव यांनी आझाद मैदान, पत्रकार परिषद भवन, आझाद मैदान पोलीस स्टेशन तसेच मुंबई महानगरपालिका येथे भेट देऊन आवश्यक पत्रव्यवहार पूर्ण केला असून आंदोलनासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या आणि पुढील कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी ११ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद भवन, आझाद मैदान, मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

तसेच १६ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आझाद मैदान, मुंबई येथे “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा, भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी उपाययोजना, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकता, नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन यासंदर्भातील विविध मुद्दे मांडण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

राज्यभरातील RTI कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक संस्था, पत्रकार, वकील, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या पत्रकार परिषदेला तसेच जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क :

◾ आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
📞 ९९३०९९२२५५ / ८९७६३००९४५

भ्रष्टाचार मिटवा – RTI वाचवा – लोकशाही वाचवा!

माहितीचा अधिकार संरक्षण म्हणजे लोकशाही संरक्षण! 🇮🇳

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top