मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक १६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. या आंदोलनाला महाराष्ट्राच्या विविध भागांतून RTI कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
या ऐतिहासिक आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि नागरिकांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच आंदोलन आणि पत्रकार परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व आभार.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले होते. त्यानंतर आज दि. १७ जून २०२६ रोजी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी आणि राष्ट्रीय सचिव श्री. बसंत चक्रवर्ती यांनी दुपारी २ वाजता मंत्रालयास भेट देऊन विविध मंत्रालयीन विभागांना स्वतंत्र निवेदने सादर केली.
याचबरोबर, संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई येथे देखील विविध जनहिताच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
लोकशाही, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त भारतासाठीचा हा लढा पुढेही अधिक जोमाने सुरू राहील, असा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
RTI वाचवा – लोकशाही वाचवा! भ्रष्टाचार हटवा – देश वाचवा!


































