August 6, 2026 Thursday
August 6, 2026 Thursday
Home » Human Rights News » RTI News » कामगारांच्या वेतनाची माहिती दर्शविणारा फलक न लावून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
a

कामगारांच्या वेतनाची माहिती दर्शविणारा फलक न लावून कंत्राटी कामगार कायद्याचे उल्लंघन; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?

पाठपुराव्यानंतरही खान बहादूर भाभा कुर्ला रुग्णालयात नियमांची अंमलबजावणी नाही;

मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या खान बहादूर भाभा रुग्णालय, कुर्ला येथे कंत्राटी कामगारांच्या वेतनासंदर्भातील आवश्यक माहिती दर्शविणारा सूचना फलक न लावल्याने कंत्राटी कामगार (नियमन व उच्चाटन) अधिनियम, १९७० तसेच वेतन संहिता (Code on Wages), २०१९ मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार आदित्य मैराळे यांनी या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल करून रुग्णालयात वेतन दर, कामाचे तास, वेतन देण्याची

तारीख, निरीक्षकांची माहिती आणि कामगारांच्या हक्कांबाबतचा सूचना फलक दर्शनी भागात लावण्याची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत प्रमुख कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधीक्षकांना आवश्यक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मुंबईच्या महापौरांनीही स्वतंत्र पत्राद्वारे नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेश देऊनही प्रत्यक्षात सूचना फलक लावण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आदित्य मैराळे यांच्या मते, सूचना फलक न लावल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन, किमान वेतनाचे दर, कामाचे तास आणि इतर कायदेशीर हक्क यांची माहिती मिळत नाही. त्यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता वाढते आणि पारदर्शकतेलाही धक्का बसतो. या प्रकरणात इतर रुग्णालयात फलक लावल्यास आम्हीही फलक लावू तसेच फक्त आमचाच भ्रष्टाचार दिसतो का kem , सायन रुग्णालयात मोठा भ्रष्टाचार होतोय आधी तो थांबवा खालून वर पर्यंत सर्वांना कमिशन जात असल्याने फलक लागणार नाही अशी भूमिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज वर्मा यांनी घेतली असून अधिकाऱ्यांनी संबंधित कायद्याची अंमलबजावणी का केली नाही, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात तातडीने सूचना फलक लावण्याची, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची आणि कामगार कायद्यांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top