November 16, 2024 Saturday
November 16, 2024 Saturday
Home » Human Rights News » RTI News » माहिती अधिकाराखाली मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेज माहितीला पुणे पोलिसांकडून नकार…
a
Pune Police refuses to provide CCTV footage information sought under Right to Information...

माहिती अधिकाराखाली मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेज माहितीला पुणे पोलिसांकडून नकार…

माहिती अधिकाराचा वापर करीत अर्जदाराने चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजबाबत एका ठराविक कालावधीतील माहिती मागितली असता, पोलीस ठाणे प्रशासनाने या माहितीच्या उत्तरा दाखल केवळ मागवलेली माहिती ही अभिलेखात बसत नाही, असे कारण पुढे करीत उत्तर देणे टाळले आहे.

पुणे : आरटीआय एक्टिविस्ट ललीत सत्यवान ससाणे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन (पब्लिसिटी हेड पुणे) यांनी माहिती अधिकाराखाली चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. त्यात त्यांनी पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा योग्य प्रकारे सुरु आहे का, येथे सीसीटीव्ही यंत्रणा चालू असल्यास सीसीटीव्ही फुटेज १२ महिन्यापेक्षाअधिक काळ जतन करुन ठेवले आहे का, सीसीटीव्हीच्या नोंदी ठेवल्या आहेत का, २० डिसेंबरचे सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही फुटेजमिळणे बाबत, तसेच आरोपी व अर्जदार यांनी केलेल्या मागणीच्या प्रती आदी गोष्टींची मागणी केली होती.

मात्र या साऱ्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस प्रशासनाने अर्जदाराने केलेली माहिती ही अभिलेखावर नाही, अर्जदाराने मागितलेल्या माहिती ही देणे बंधनकारक नाही, कारण कॅमेरे सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात लावण्यात आले आहेत, अशा आशयाची उत्तर देत माहिती देण्यास नकार दिला आहे. 

याविषयी बोलताना आरटीआय एक्टिविस्ट प्रदीप नाईक म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाणे परिसरात सीसीटीव्ही लावून त्यांचे फुटेज जतन करणे बंधनकारक आहे. तसेच २०२२ रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्याय मूर्ती रेवती देरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चौव्हाण यांनी पोलीस स्टेशन हे गोपनीयतेचे कलम २(८) नुसार पोलीस स्टेशन गोपनीयतेच्या व्याख्यात बसत नाही असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून ही जन माहिती अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायलायची जाणीवपूर्वक आवमानना केली असल्याचे स्पष्ट लक्षात येत आहे. त्यानुसार माहिती अधिकाराखाली सीसीटीव्ही फुटेजची अर्जदाराने मागणी केली असता पोलिसांनी ती पुरविणे आवश्यक होते. 

अर्जदाराला माहिती न देता सीसीटीव्ही फुटेजबाबत अशी साशंकता ठेवणे हा एक प्रकार न्यायालयाचा अवमान आहे. पुण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त याबाबत कोणती कारवाई करतील, याकडे आमचे लक्ष आहे. कारण लोकशाहीत लोकशाहीची यंत्रणा म्हणून काम करत असताना पोलिसांनी संबंधीत माहिती देणे गरजेचे होते, असे मत ‘नाईक व ससाणे’ यांनी व्यक्त केले.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top