रायगड प्रतिनिधी :
पेण फौजदारी व दिवाणी न्यायालय मध्ये पेण पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे,दादर पोलीस ठाणे या मधील फौजदारी कामे येत असतात ही कामे येत असताना रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांचा ठराविकच हितसंबंध वकिलांना नेमण्यात बाबत आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना कळवले जात आहे तसेच त्यांच्या वर दबाव आणला जातो हाच वकील करा तरच बेल मिळवण्यासाठी मदत केली जाईल तसेच केस देखील तुमच्या प्रमाणे चार्ज शीट तयार केली जाईल साक्षीदार तुमच्या प्रमाणे ठेवा तुम्हाला निर्दोष मुक्तता केली जाईल आम्ही सुचवलेला वकील केला तर तुम्हाला बेल मिळणार नाही व आरोपींना शिक्षा देण्यात येईल अशा चर्चा पेण कोर्टातील विधी मध्यस्थ रूम पोलीस चालू आहे.
पोलीसशी आर्थिक हितसंबंध असलेलं १ ते २ वकील हे पोलीस ठाण्यात जाऊन वकील पत्रा सह्या आणणे एकाच वकील व त्यांचे ज्युनिअर रिमांड कामे चालवणे ४१अ प्रमाणे नोटीस दिलेले केस मध्ये लागे संबंध असलेले वकील सुचवणे हेच वकील सरकारी वकील नावाने पैसे घेणे तसेच एखाद्या केस निकाल तुझ्या बाजूने लावून देतो न्यायक्षिश पैसे द्यावे लागेल असे न्यायालयात घडत असून यांसारख्या तक्रारी पेण न्यायालयात दाखल झालेल्या आहे तसेच दबक्या आवाजात पेण कोर्टात चर्चा चालू आहे तरी सर्व सामान्य नागरिकांचा न्यायालयात रिमांड कामाबाबत व न्यालयावरचा विश्वास उडाला आहे.
या सर्व मध्ये पेण पोलीस ठाणे येथील तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस जास्त कार्यरत असल्याचे माहीत उघड झाली आहे याबाबत लवकरच पेण बार मधील वकील याबाबत तक्रार पोलीस महासंचालक व महाधिवक्ता सरकारी वकील कार्यालय मुंबई राज्य पोलीस तक्रार निवारण आयोग येथे दाखल करण्याबाबत कळाले आहे कायदा व सुव्यवस्था ही पोलीस तपासणी अंमलदार व अर्थिक हितसंबंध असलेले वकील कमकुवत करत असल्याचे कळले जाते.