July 27, 2024 Saturday
July 27, 2024 Saturday
Home » Policy » जुन्या वाहनांची नव्याने नोंदणी महाग होणार; आठपट शुल्क आकारणार
a
New registration of old vehicles will be expensive; Will charge eight times

जुन्या वाहनांची नव्याने नोंदणी महाग होणार; आठपट शुल्क आकारणार

ठळक मुद्दे

•८ वर्षांनतर व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घेणे बंधनकारक असेल.

•फिटनेस तपासणीसाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे.

• बस अथवा ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे शुल्क १,५०० रुपयांवरून १२,५०० रुपये होईल

नवी दिल्ली : एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या वाहनाच्या नोंदणी नूतनीकरणासाठी मालकास तब्बल आठपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठीही आठपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

वाहनांच्या नोंदणीविषयीचे नवे नियम पुढील वर्षापासून लागू होत असून रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना सोमवारी जारी केली,

दिल्ली व आजूबाजूच्या प्रदेशावर नव्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण, येथे १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर आधीच बंदी घालण्यात आलेली आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या कारच्या नोंदणी नूतनीकरणासाठी सध्या फक्त ६०० रुपये शुल्क लागते. अधिसूचनेनुसार, ते पुढील वर्षी ५ हजार रुपये होईल. जुन्या बाइक्सचे नोंदणी शुल्क ३०० रुपयांवरून १ हजार रुपये होईल. बस अथवा ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे शुल्क १,५०० रुपयांवरून १२,५०० रुपये होईल. सूत्रांनी सांगितले की, लोकांनी जुनी वाहने बाळगू नयेत, यासाठी शुल्कांत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय १५ वर्षांनंतर वाहनाच्या नोंदणीचे नूतनीकरण दर ५ वर्षांनी करावे लागेल. ८ वर्षांनंतर व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घेणे बंधनकारक असेल. फिटनेस तपासणीसाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे.

उशीर झाल्यास लागणार विलंब शुल्क

वाहनांच्या नोंदणीच्या वेळेत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. नूतनीकरणास उशीर झाल्यास प्रत्येक महिन्यासाठी ३०० रुपये विलंब शुल्क लागेल, व्यावसायिक वाहनासाठीचे विलंब शुल्क ५०० रुपये असेल. फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणास उशीर झाल्यास दररोज ५० रुपयांचे विलंब शुल्क लागेल.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top