April 2, 2026 Thursday
April 2, 2026 Thursday
Home » Human Rights News » RTI News » BMC रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनात कोट्यवधींचा घोटाळा?
a

BMC रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनात कोट्यवधींचा घोटाळा?

खान बहादुर भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक , वैद्यकीय अधिकारी आणि लेखा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबई प्रतिनिधी:
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खान बहादूर भाभा रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामगारांच्या घामाची उघड लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (NAPF) या संघटनेने महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रुग्णालयातील सुमारे ५३ कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे बंधनकारक असतानाही त्यांना कमी पगार दिला जात आहे. किमान वेतनानुसार सुमारे ₹१९५००/- इतके मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ₹१५,३३९/- इतके वेतन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून चौकशी झाल्यास सर्व काही बाहेर येईल असे सांगण्यात येत आहे.

यामुळे प्रत्येक कामगाराला दरमहा सुमारे ₹४१२०/- इतका आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, एकूण रक्कम लाखोंमध्ये असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, हा प्रकार दीर्घकाळापासून सुरू असून संबंधित कंत्राटदार आणि वैद्यकीय अधीक्षक , लेखा अधिकारी यांच्यात संगनमत असल्या शिवाय हा गैरव्यवहार करणे शक्य नाही अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कामगारांना नोकरी जाण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून कमी वेतन स्वीकारले जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक शोषण नसून कामगार कायद्यांचे उघड उल्लंघन असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी जबाबदार वैद्यकीय अधीक्षक डॉ.पद्मश्री अहिरे , वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज वर्मा आणि लेखा अधिकारी एल वॉर्ड यांची तत्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच कामगारांना थकबाकीची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा येईल तसेच न्यायालयात दाद मागण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top