मुंबई प्रतिनिधी :
संघटनेच्या किर्तीला नवा सोनेरी अध्याय..!
समाजसेवेचा वसा आणि न्यायाची लढाई लढणारे ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ’ चे कणखर स्तंभ, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि तळमळीचे कार्यकर्ते तसेच ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ’ चे प्रसिद्धी प्रमुख मा. श्री. सचिनजी बापू खरात साहेब यांची ‘आर टी आय टाईम्स’ या नामांकित प्रेस मीडियाच्या मुंबई रिपोर्टर पदी झालेली निवड ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नाही, तर संपूर्ण संघटनेसाठी गौरवाचा क्षण आहे.
आपल्या तडफदार नेतृत्वाने आणि अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीने खरात साहेबांनी संघटनेच्या वाटचालीला नेहमीच नवा आयाम दिला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवताना, वंचितांच्या हक्कासाठी लढताना आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडताना त्यांनी नेहमीच सत्याची बाजू घेतली. कायद्याचे सखोल ज्ञान आणि समाजभान यांच्या जोरावर त्यांनी अन्यायाविरुद्ध लढाई केली आहे.
खरात साहेबांची ही निवड म्हणजे त्यांच्या निष्ठेची आणि कार्यक्षमतेची पावती आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांचा आवाज आता अधिक बुलंद होणार आहे. त्यांची लेखणी ही आता केवळ बातमी देणारी नव्हे, तर अन्यायाच्या विरोधात लढा उभारणारी आणि सत्याला न्याय मिळवून देणारी ठरणार आहे.
ही निवड म्हणजे संघटनेच्या विचारधारेचा विजय आहे. सत्य, समता आणि न्यायासाठी लढणाऱ्या या प्रवासात खरात साहेबांचे योगदान आता आणखी मोठ्या व्यासपीठावरून दिसेल, याचा सार्थ अभिमान संघटनेला आहे.
‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघा’ तर्फे मा. श्री. सचिनजी बापू खरात साहेब यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
“हातात लेखणी, मनात समाजभान – खरात साहेब आता सत्यासाठी नव्या उंचीवर!”
💐 शुभेच्छुक 💐
गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ आणि परिवार 🚩