यवतमाळ : शासकीय सुखकर प्रवास म्हनुन अनेक ज्येष्ठ नागरिक रेल्वेने प्रवास करतात पण आता त्यांचा हा प्रवास महाग झाला आहे. वाढत्या वयानुसार त्यांचा तिकीट खर्च ही महाग झाला आहे.
रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांना वयाची ६० वर्ष पूर्ण पुरुषांना ४० टक्के तर ५८ वर्ष पूर्ण महिलांना ५० टक्के प्रवास सवलत दिली जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते अब्राहाम आढाव वडगावशेरी पुणे यांनी ऑनलाईन माहितीचा अधिकार ९/११/२०२१ रोजी सेंट्रल रेल्वे बोर्ड दिल्ली ला सादर केला. त्यामधे विचारण्यात आले की जेष्ठ नागरिकांना प्रवास सवलत रद्द करण्यात आल्याची दिनांक व केंद्रीय शासनाचा आदेश देण्यात यावा.
तसेच रेल्वे मध्ये प्रवास सवलत बंद केल्याची सूचना आपण कोणत्या माध्यमातून प्रकाशित केली आणि रेल्वेला जेष्ठ नागरीकांच्या तिकिटामधून किती नफा झाला यावर १२/११/ २०२१ ला सी पी आय ओ अधिकारी विपुल सिंह यांनी उत्तर देताना सांगितले की, २०/३/ २०२० पासून कोविड महामारी कारण दाखवून सर्व रेल्वे गाडीमधून जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना प्रवास सवलत पूर्ण बंद केली असून प्रवास सवलत बंद केल्याची सूचना प्रकाशित केली नाही असे स्पष्ट केले आहे. रेल्वे बोर्ड अधिकारी रोहित कुमार यांचे सही असलेले माहिती पत्रक सोबत त्यांनी दिले आहे. गरिबांचा प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.मात्र आता पॅसेंजर तसेच मेल एक्स्प्रेस मध्ये कुठल्याही जेष्ठ नागरिकांना सवलत मिळणार नाही.
तसेच रेल्वे मधील, जेष्ठ कोच मधील जेष्ठ नागरिकांची सवलत ही बंद केली असून सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना यांचा मोठा फटका बसणार आहे. तसेच प्रवास सवलत म्हणून अनेक लोक बी पी टी तिकीट रिटर्न जर्नी प्रवास बुक करतात त्यामधे १२० रुपयांपर्यंत सवलत मिळते आता ती ही पूर्ण बंद आहे.
नुकतेच रेल्वेने शुक्रवार दिनांक १२ /११/२१ रोजी जाहीर केले की रेल्वे पूर्ववत होणार असून विशेष रेल्वेच्या नावाखाली अतिरिक्त भाडे घेणे बंद केले असून. सर्व गाड्या नियमित धावणार आहेत. गाडी नं. च्या आधी लावलेला शून्य हटवून नियमित नंबर नुसार सर्व रेल्वे गाड्या धावणार आहेत. मात्र जेष्ठ नागरिकांची प्रवास सवलत दिली जाणार नाही हे यातून स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे कुठल्याही रेल्वे बुकिंग काउंटरवर याची सूचना लावलेली नाही.