माहिती अधिकारात नावे उघड…
शेठ आणि मोटाभाईंचा समावेश
नावे जाहीर करण्यास मुख्यमंत्री घाबरले,
राजापूरमधील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पासाठी २२०० एकर जमिनीची संमतीपत्रे या तथाकथित ‘कोकणी’ ग्रामस्थांची नावे जाहीर करण्यास नमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अद्याप घाडस झाले नसले ही नावे आता फुटली आहेत. माहिती अधिकारातच ही उघड झाली आहेत. त्यात शेठ आणि मोटाभाईंच्या चाईकांचाच भरणा असल्याचे दिसून येत आहे.
माहिती अधिकार कार्यकत्यांनी ही नावे सरकारकडे मागितली तीन महिन्यांपूर्वीच ती त्यांना मिळाली आहेत. ती नावे न प्रत्येक कोकणी माणसाला धक्काच बसेल. गुजराती, समाजातीलच लोक त्यात जास्त आहेत. त्यांना इतकी न राजापूरमध्ये कशी मिळाली हे आश्चर्य असले तरी या थोड्याथोडक्या नव्हे तर २२०० एकर जमिनीसाठी पत्रे दिली आहेत. त्यामुळेच त्यांची नावे विधान परिषदेत र करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही धाडस सांगितले जाते, असे या माहिती अधिकार कर्त्यांनी सांगितले.
हेच ते तथाकथित नाणारवासीय
नाणारवासीय गौरव विनयकुमार जैन, दीपेन भरत में पुनीत सतीश वाधवा, सौरभ सुरेंद्रकुमा जैन, प्राची त्रिपाठी, पुखराज बोथमल सिंघवी, हिमांशू प्रशांत नीलावार, दिने धर्मशी शहा, किशोर रातीलाल शहा, मित्तव वर्दीभाई दोषी, कनक रतनलाल दुग्गर, राजेश सुंदतलाल शाह, संतोष रातनलाल कटारिया, अनिताबेन जितेंद्र शाह, सिद्धी रिषभ शाह, सतीश किशन केडिया, सपना सुभाष केडिया, गौतम जेथमल जैन, सुभाष किसन केडिया, महेश कांतीलाल शाह, विलास रतनल कटारिया, गानेढं भिवराज भुतडा, नंदकिशोर कन्हैयालाल चांडक, अमि घनश्याम ठावरी, उमाकांत मनोहरला राठी, अस्मिता दिनेश मांगूकिया, मन रामरंजन झुनझुनवाला, संजय भिकुल दुधावत, प्राची अमित शाह, महेंद्र मांगीलाल शाह.









