मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या भांडवलदारांसाठी देश विकायला काढला आहे. देशातील अमाप संपत्तीची लुटली जात आहे.पण या मोदींना आता देशातील शेतकऱ्यांनी हरवले आहे, त्यामुळे त्यांना कृषी विरोधात कायदे मागे घ्यावे लागले आहेत..आता आमची लढाई ही देश वाचविण्यासाठी आहे. देशाची भांडवलदारांकडून होणारी लूट थांबवायची आहे, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आझाद मैदानातील शेतकरी कामगार महापंचायतमध्ये केले.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्ती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत आझाद मैदानात विराट शेतकरी कामगार महापंचायत भरवण्यात आली आहे. या महापंचायतमध्ये देश देशातील शेतकरी कामगार नेते उपस्थित आहेत.
पाटकर म्हणाल्या की, लॉक डाऊन मध्ये भांडवलदार आणि त्यांच्या कंपनीच्या तिजोऱ्या भरणासाठी २१ कायदे आणले..ते लागू करावेत म्हणून हिंसा केली जाते…लोक उपाशी मारत आहेत. लोकांना आपले हक्क मिळत नाहीत त्यामुळे आज देश वाचवण्याची गरज आहे.
संयुक्त मोर्चा..देशातील जल जमीन जंगल जमीन वर आपला आधार सांगून या देशात आपला हक्क मिळवून घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता आम्ही देहात हमी भाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ४ डिसेंबर रोजी संसदेत काय होईल ते पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले जाणार आहेत, ही आमची पहिली जित आहे…पुढं आमची लढाई बाकी आहे असल्याचेही पाटकर म्हणाल्या.