आरटीआय एक्टिविस्ट विजय बिळूर यांनी RTI मार्फत काढली महत्वपूर्ण माहिती व प्रशासनाला विचारला जाब...
देशभरात शासनाद्वारे अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती केली जात आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाया केल्या जात असताना शासकीय वाहनामध्ये मात्र जादूटोणा, वशीकरण, कियाकर्म यासारख्या जाहिराती लावल्याचे आढळून येत आहे.
कर्नाटकातील शासकीय बसेसमध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. याबाबत RTI ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट असोसिएशनचे कर्नाटकचे चीफ पब्लिसिटी हेड विजयकुमार बिळूर यांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली असता कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन बँगलोर यांनी अशाप्रकारच्या जाहिराती लावण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे व अंधश्रद्धेला कोणताही पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शासकीय वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अशा प्रकारच्या जाहिरातीतुन समाजमनावर विपरीत परीणाम होतात. अंधश्रद्धा ही आर्थिक शारीरिक व मानसिक नुकसान करणारी गोष्ट आहे. अशा गोष्टींना बळी पडल्यामुळे कित्येक मनुष्य व प्राणी हत्या झाल्या आहेत. समाजात पुन्हा अंधश्रद्धेची मुळं घट्ट रुजण्याआधी ती नष्ट करणे गरजेचे आहे अशाप्रकारच्या जाहिराती संदर्भात संबंधित आस्थापनेकडून वेळोवेळी योग्य त्या कारवाया होत नसल्याने आशा गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात याचे फार मोठे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील अशी चिंता व मत विजयकुमार बिळूर यांनी व्यक्त केले.
कर्नाटक अमानवी अनिष्ट प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक व उच्चाटन कायदा, २०१७ अंतर्गत अंधश्रद्धा पसरवणे व त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करणे हा गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी किमान ५ हजार रुपये ते कमाल ५० हजार रु.पर्यंत दंड व किमान एक वर्ष ते कमाल सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. या संदर्भात संबधित कर्नाटकचे परिवहन विभाग आणि समाज कल्याण विभाग मंत्री बी. श्रीरामुलु यांचेकडे तसेच विजयपुरा जिल्हा कलेक्टर व आगार प्रमुख यांचेकडे दिनांक १४ डिसेंबर २०२२ रोजी लेखी तक्रार दिली असून यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करणेत आली आहे.
विडिओ लिंक – https://fb.watch/hOKcnkYXhj/