पेट्रोल आणि डिझौलवर आकारण्यात आलेल्या केंद्रीय उत्पादन शुल्कामुळे केंद्र सरकारला २०२०-२१ (एप्रिल, २०२० ते मार्च,२०२१) या आर्थिक वर्षात ३ लाख ७२ हजार कोटी रुपये महसूल प्राप्त झाला.
दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात आलेल्या उत्पादन शुल्कातून केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३ लाख ७२ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कालावधीत केंद्र सरकारला दररोज हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत ही माहिती दिली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात इंधनावरील करामुळे केंद्राला प्राप्त झालेल्या महसुलाची माहिती दिली. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझौलवर आकारण्यात आलेल्या केंद्रीय उत्पादन शुल्कामुळे केंद्र सरकारला २०२०-२१ (एप्रिल, २०२० ते मार्च,२०२१) या आर्थिक वर्षात ३ लाख ७२ हजार कोटी रुपये महसूल प्राप्त झाला.
महसुलातून राज्याला निधी वितरित
२०१९-२०२० या आर्थिक वर्षात याच कालावधीत १ लाख ७८ हजार कोटी रुपये महसूल जमा झाला होता. इंधनकरातून मिळालेल्या महसुलातून केंद्राने राज्यांना १९ हजार ९७२ कोटी रुपयांचा निधी वितरित केला. असेही चौधरी यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.