माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश…
कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा…
मुंबई : कुठल्याही कामानिमित्त सरकारी कार्यालयात गेल्यावर नागरिकांना बऱ्याचदा या कक्षातून त्या कक्षात फिरावे लागते. अधिकारी जागेवर नसणे, कर्मचारी दुसऱ्याच कक्षात असणे, हा अनुभव लोकांसाठी नित्यनेमाचा असतो. त्यामुळे नागरिकांचा विनाकारण खोळंबा होतो. आता मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवरच बसावे, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जागेवरून हलता येणार नाही. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या लढ्याला हे यश आले आहे.
राज्य सरकारची महावितरण ही थेट सर्वसामान्यांशी संपर्क येणारी सर्वात मोठी कंपनी आहे. ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत या कंपनीसह महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र सोबत बाळगणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे तसे निर्देश आहेत. ओळखपत्र सोबत नसल्यास व ग्राहकाने तक्रार केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला धनादेशाद्वारे ५० रुपये दंड भरावा लागतो. याविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते उज्जवलराय जोशी यांनी लढा दिला होता. त्यानंतर आता ऊर्जा विभागातील कर्मचारी नित्यनेमाने ओळखपत्र वापरतात. परंतु वीज नियामक आयोग कार्यालयात जोशी यांना वेगळा अनुभव आला. याबाबत जोशी यांनी सांगितले की, ‘आयोगाती अनेक कर्मचारी ओळखपत्राचा वाप करीत नव्हते. तसेच काही अधिकार कर्मचारी आपल्या जागेवर नस त्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायच त्याविरुद्ध तक्रार केली होती. वेगवेगळ स्तरावर पाठपुरावा केल्यानंत आता आयोगाने सर्व अधिकाऱ्यां ओळखपत्राचा वापर करण्यासह आपल्या ठरलेल्या जागेवरच बसणे, टेबला नावाची पाटी लावणे आदी सूचना दिल आहेत. मुख्य म्हणजे हा नियम राज सरकारी सर्व कर्मचाऱ्यांना लागू झात आहे. वास्तवात यासंबंधी २०२० शासन आदेशदेखील आहे. आता न सूचनेनुसार हा आदेश सर्वांसाठी ला झाला आहे.’ या आदेशामुळे, उगाच इकडेतिकडे फिरत वेळ घालवणान कर्मचाऱ्यांना चाप बसणार असून नागरिकांची कामे वेळेत होतील’, अम भावना व्यक्त होत आहे.