आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे. आज प्रत्येक व्यक्ती बहुतांश व्यवहार ऑनलाईन करतो. यात पेमेंट देखील ऑनलाईन करण्याचा ट्रेंड वाढला आहे. परंतु फीचर फोन वापरणाऱ्या मोबाईल ग्राहकांना मात्र याचा लाभ घेता येत नव्हता. परंतु आता या ग्राहकांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे.(Good news from RBI)
स्मार्टफोन वापरकर्त्यांप्रमाणे फीचर फोन वापरणाऱ्यांनाही UPI पेमेंटची सुविधा मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट प्रोडक्ट आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरणाच्या घोषणेदरम्यान ही माहिती दिली.
डिव्हाइसवर UPI वॉलेट लाँच केले जाईल
याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कमी मूल्याचे व्यवहार अधिक कार्यक्षम करण्यासाठी UPI अॅपमध्ये ‘ऑन-डिव्हाइस’ वॉलेट सुरू करणार आहे. RBI च्या मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट नुसार, भारतात सुमारे 118 कोटी मोबाइल वापरकर्ते आहेत आणि त्यापैकी सुमारे 74 कोटी स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. म्हणजेच देशात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 44 कोटी आहे.
RBI च्या या 3 मोठ्या घोषणा गेम चेंजर ठरणार आहेत
1. ऑन डिवाइस यूपीआई वॉलेट
लहान रकमेच्या पेमेंटसाठी UPI वॉलेट.
इंटरनेटशिवाय ऑफलाइन व्यवहार शक्य होणार.
स्मार्टफोनमध्ये UPI द्वारे वॉलेटमध्ये पैसे जोडले जाऊ शकतात आणि इंटरनेटशिवाय लहान रक्कम भरली जाऊ शकते.
ग्राहकांना व्यवहार अयशस्वी झाल्याची तक्रार राहणार नाही.
बँकांच्या सेवांवर कमी भार पडेल आणि संसाधनांचा खर्चही कमी असेल.
प्रीपेड साधनांच्या धर्तीवर ऑन-डिव्हाइस UPI वॉलेट लाँच केले जाईल.
UPI व्यवहारांमध्ये, 50% पेमेंट 200 रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी केले जाते.
ग्राहकांच्या व्यवहाराच्या अनुभवात कोणताही बदल होणार नाही.
लहान पेमेंटसाठी UPI वॉलेटमध्ये निश्चित रकमेची मर्यादा असेल.
2. फीचर फोनसाठी UPI
देशातील 44 कोटी ग्राहकांसाठी हे वरदान ठरेल.
इंटरनेटशिवाय फोनद्वारे UPI पेमेंट
रेगुलेटरी सैंडबॉक्स द्वारे रिटेल पेमेंट्सची सुरवात
UPI शी कनेक्ट केल्यानंतर फीचर फोनचे ग्राहक BNPL साठी पात्र होतील
3. डिजिटल पेमेंटसाठी शुल्क परवडण्याजोगे करण्याचा विचार
डिजिटल पेमेंटचे शुल्क सर्वांसाठी परवडणारे बनविण्याचा विचार.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पीपीआयशी संबंधित शुल्कांवर चर्चापत्र जारी केले जाईल.
व्यापारी संबंधित MDR शुल्क विचारात घेतले जाईल.
सुविधा शुल्क आणि पेमेंटमध्ये आकारले जाणारे अधिभार यावर अभिप्राय घेतला जाईल.