10 जून 2024 रोजीचे उपोषणाला यश…
पुणे प्रतिनिधी :
शिक्षणाचा धंदा बंद करण्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, पालकांची, शासनाची फसवणूक थांबवण्यासाठी. जे अधिकारी खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना पाठीशी घालतात त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी, ज्या शाळेत, एकेडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बोगस ऍडमिशन आहेत त्या शेळ्यांची मान्यता रद्द करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यासाठी आरटीआय ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिटी असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष मोहसिन पठाण 10 जून 2024 रोजी पाचव्यांदा पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालय समोर उपोषणास बसणार होते पण त्यांच्या उपोषणाल अनुसरून जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक, बारामती, इंदापूर, दौंड चे गटशिक्षणाधिकारी व सर्व शाळेतील प्राचार्यांना उपस्थित राहायला सांगितले होते. सदर बैठकीमध्ये पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी सर्व शाळांना विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणे बंधनकारक आहे असे आदेश दिले आहेत व येत्या 18 जून 2024 पर्यंत सर्व शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवून त्याचा अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालयाला सादर करण्यास लावला आहे. विद्यार्थ्यांची दिवसातून दोन वेळा हजेरी घेणे बंधनकारक आहे, शालेय वेळात विद्यार्थी अकॅडमी कोचिंग क्लास मध्ये आढळला त्या संबंधित शाळेंवर कारवाई करण्यात येईल असे सूचना दिल्या आहेत. ज्या शाळांचे बांधकाम आर.टी.इ ॲक्ट 2009 अनुसार नाही त्यांच्यावर कारवाई होणार व बारामतीत शिकणारी पोरं ही परीक्षेसाठी इतर तालुक्यात जाणार नाही यासाठी एक्झामिनेशन सेंटर रिव्हाईज करायचा निर्णय डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी घेतला आहे.
बारामतीत खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांचे पेव फुटले होते, शिक्षणाच्या नावाखाली गोरगरीब पालकांकडून लाकांनी फी घेऊन, त्यांची बोगस ऍडमिशन बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस, करमाळा तालुक्यातील विविध शाळेत केले जात होते. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना पालकांना मानसिक त्रास दिला जात होता, त्यांचे हॉल तिकीट थांबवली जात होते तसेच परीक्षा वेळी कॉपी पूरून विद्यार्थ्यांना भरमसाठ मार्क्स पाढून दिले जात होते, त्यावर तक्रार केली असता सदर एक्झामिनेशन सेंटरवर बैठे पथक नेमण्यात आले ज्या मुळे अनेक कॉफी केस ही झाल्या, त्याच पडलेल्या मार्कांच्या जीवावर मोठमोठ्या जाहिराती करून अकॅडमी कोचिंग क्लास येथे ऍडमिशन वाढवले जात होते. या सर्व गोष्टींवर चाप बसण्यासाठी मोहसिन पठाण गेल्या फेब्रुवारी 2023 पासून विविध सरकारी कार्यालयात तक्रारी अर्ज करत आंदोलन उपोषण करत आहेत.
याचीच दखल घेत केंद्र सरकारने खाजगी कोचिंग क्लास चालवण्याकरिता 09 जानेवारी 2024 रोजी विशेष गाईडलाईन्स लागू केले आहेत. बारामतीचे तहसीलदार यांनी ज्या खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना फायर ऑडिट नाही, त्यांना बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. आता या सर्व गोष्टींना बायोमेट्रिक हजेरी मुळे चाप बसणार आहेत. हा विषय बारामती इंदापूर दौंड पुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे म्हणून येथे अधिवेशनात हा निर्णय राज्यभर लागू करण्यात यावा यासाठी आंदोलन ही करणार याची माहिती पठाण यांनी दिली आहे.