प्रतिनिधी : विजय वाघ
ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा अध्यक्षा सौं सपना रोशन भगत यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत भात खायला दिल्याने शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. भात आणि आंबलेली मटकीची आमटी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्व मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.
ठाणे महानगर पालिके च्या शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार दिला जातो. मात्र याच पोषण आहारामधून शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना ह्या आधी पण घडलेली असताना देखील ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मुखत्वे आहारात खिचडी दिली जाते. याच खिचडीतून ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे पुन्हा समोर आलेल आहे. मात्र या प्रकरणी आता ठेकेदारांवर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौं सपना रोशन भगत यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकसआहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की, अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होते. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते.
या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ८८ येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली. त्यात पाल असल्याचे आढळून आले आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४० पोरांना याचा हळू हळू त्रास जाणवू लागला. याची तात्काळ सूचना ही महापालिकेच्या अधिकाऱ्याने देण्यात आली व महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली. अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत आहे, परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळखेळणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे.
गेल्या दोन महिन्यात दिवा विभागात अनेक घटना घडल्या आहेत. साबेगावात अशीच घटना घडली होती बी. आर. नगर मध्ये पण अशाच प्रकारच्या घटना या वारंवार विभागात घडत आहेत तरी तातडीने या खिचडी देणाऱ्या ठेकेदार यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असे सौं सपना रोशन भगत यांनी म्हटले आहे.