मुंबई प्रतिनिधी :
मा. पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला मुंबई, कार्यालयात दि. २६ नोव्हेबर संविधान दिवस, संविधान संरक्षण निमित्ताने निवेदन व पुस्तक देन्यात आले. न्यायव्यवस्थापक, न्यायरक्षक, यांचे सेवेशी विनंतीपूर्वक संविधान संरक्षणहेतू आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे एक्टिविस्ट श्री. राजेश माकोडे, पुणे, श्री. सचिन खरात, सायन मुंबई, डॉ. फाहीम शेख, मुंबई यांच्या वतीने निवेदन व आरटीआय पुस्तक देन्यात आले अनेक विषयावर वार्तलाब झाली.
विषयः- दि २६ नोव्हेबर संविधान दिवस, संविधान संरक्षण निमित्ताने निवेदन महोदय, सन्माननीय महोदय उपरोक्त विषयानुसार आपल्याकडे विनंती अर्ज आरटीआय ह्युमन राईट्स एक्टिविस्ट असोसिएशन सादर केला व त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असतात आपल्या विभागात अनेक अडचणी येतात काही मोजके अधिकारी कर्मचारी कायद्याची अंमलबजावणी करत नाही असे निदर्शनास येते. एक एक वर्ष तक्रारी धूळ खातात पण न्याय निवाडा होत नाही म्हणून अश्या अधिकारी कर्मचारी विरुद्ध दप्तर दिरंगाई कायद्याचे तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आपल्या विभागात दिशा निर्देश देऊन संविधानाचे संरक्षण होईल आणि सामान्य माणसाला न्याय मिळवणे सोपे जाईल.
काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी च्या वागणूकीमुळे आपल्या विभागाची प्रशासनामध्ये बदनामीचे प्रकार वेगाने वाढत आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५, दप्तर दिरंगाई कायदा २००६ कायदेशीर पालन व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार विरोधात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, संपादक व आरटीआय कार्यकर्ते त्यांच्या अर्जावर जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. काही ठिकाणी अधिकारी हेतूपुरस्सर चुकिचे उत्तर देतात भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून पळवाट काढण्याहेतू कायद्याचे उल्लंघन करून चुकीचे उत्तर देतात. सामान्य जनता त्रस्त होते.
कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करून आपणांस विनंती करतो की, संविधानाचे आणि वरील नमूद कायद्याचे संरक्षण होणे करीता संपूर्ण पोलिस विभात कमेटी गठित करण्यात यावी अशी मागणी आमच्या या अर्जाद्वारे आपल्या दलनात आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन कडून विनंती करण्यात आली.