माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केला माहीती अधिकारातून भांडाफोड
बीड : अतिवृष्टीने / नैसर्गिक आपत्तीने शेतकर्यांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळते विमा कंपनीला केंद्र व राज्य सरकार कडून विमा हिसा अनुदान मात्र कोट्यवधी त मिळते तर शेतकर्यांना मात्र नुकसान भरपाई हजारात मिळते यांचा माहीती अधिकारातून माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांना माहीती अधिकारात भांडाफोड केला आहे. त्यामुळे विमा कंपनी मालामाल शेतकरी कंगाल असेच म्हणावे लागेल.
माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी कृषी विभागाकडे माहीती अधिकार अर्ज दाखल करुन खरीप हंगाम 2020/2021 वर्षातील कालावधीत बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसान भरपाईची सद्यस्थितीची माहीती मागितली होती.
दि. 17/12/2021 रोजी कृषी विभागाने माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांना दिलेल्या पिक विमा वाटपाच्या आणि नुकसान भरपाईच्या तपशिलात म्हटले आहे कि प्रधानमंत्री खरीप पिक विमा 2020 मध्ये सहभागी शेतकरी यामध्ये कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार असे मिळून एकूण 1790087 शेतकरी सहभागी झाले होते.
विमा हप्ता संरक्षित रक्कम 2492.46 कोटी रु ईतकी होती तर जमा विमा हप्ता रक्कम 60.68 कोटी ईतकी होती तर विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान 405.69 कोटी ईतके होते व विमा हप्ता केंद्र हिसा अनुदान 331.67 कोटी तर एकूण विमा हप्ता 798.05 कोटी आहे तर नुकसान भरपाईचा तपशिल स्थानिक नैसर्गिक आपती नुकसान भरपाई लाभार्थी संख्या 5777 ईतकी आहे तर त्याची नुकसान भरपाई 294.64 लाख ईतकी आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत एकूण नुकसान झालेले एकूण लाभार्थी संख्या 0 म्हणजेच शुन्य आहे व तसेच नुकसान 0 म्हणजेच शुन्य रुपये ईतकी आहे.
तर काढणी पाश्चात नुकसान भरपाई लाभार्थी संख्या 2287 ईतकी आहे तर नुकसान भरपाई रू 272.46 लाख ईतकी आहे पिक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई लाभार्थी संख्या 12580 ऐवढी आहे. तर त्याची नुकसान भरपाई 787.50 लाख ईतकी आहे तर एकूण लाभार्थी संख्या 20644 ऐवढी आहे तर एकूण नुकसान भरपाई 1354.60 लाख रुपये ईतकी वाटप केली आहे तर खरीप पिक विमा 2021 या वर्षात सहभागी कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार शेतकरी असे मिळून एकूण 1167935 शेतकरी सहभागी झाले होते तर विमा हप्ता संरक्षित रक्कम 1856 कोटी रु ईतकी होती तर जमा विमा हप्ता रक्कम 43.71 कोटी ईतकी होती तर विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान 304.34कोटी ईतके आहे. व विमा हप्ता केंद्र हिसा अनुदान 247.02 कोटी आहे तर एकूण विमा हप्ता 595.07 कोटी आहे तर नुकसान भरपाईचा तपशिल स्थानिक नैसर्गिक आपती नुकसान भरपाई लाभार्थी संख्या 600337 ईतकी आहे तर त्याची नुकसान भरपाई 35000.00 लाख ईतकी आहे.
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत एकूण नुकसान झालेली एकूण लाभार्थी संख्या 458128 ईतकी आहे व तसेच नुकसान भरपाई 15093.69 लाख रु ईतकी आहे तर एकूण लाभार्थी संख्या 1058465 ईतकी आहे तर एकूण नुकसान भरपाई 50093.69 लाख ईतकी आहे तर नुकसान भरपाई वाटप तपशिल स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई लाभार्थी संख्या 580117 ईतकी आहे नुकसान भरपाई 25964.21 लाख रु ईतकी आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले एकूण लाभार्थी संख्या 441911 आहे तर त्यांची नुकसान भरपाई 14988.33 लाख रु ईतकी आहे तर नुकसान भरपाई लाभार्थी संख्या 1022028 ऐवढी आहे तर नुकसान भरपाई रक्कम 40952.54 ईतकी आहे.
माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांना माहीती अधिकारात 2021 मधील प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा हा तपशिल दि,16/12/2021 पर्यत देण्यात आला आहे व तसेच माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी सरसकट नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी केली आहे.