April 21, 2025 Monday
April 21, 2025 Monday
Home » Health » ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत खिचडीतून ४० मुलांना विषबाधा
a

ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत खिचडीतून ४० मुलांना विषबाधा

प्रतिनिधी : विजय वाघ

      ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा अध्यक्षा सौं सपना रोशन भगत यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत भात खायला दिल्याने शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. भात आणि आंबलेली मटकीची आमटी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्व मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.

ठाणे महानगर पालिके च्या शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार दिला जातो. मात्र याच पोषण आहारामधून शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना ह्या आधी पण घडलेली असताना देखील ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मुखत्वे आहारात खिचडी दिली जाते. याच खिचडीतून ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे पुन्हा समोर आलेल आहे. मात्र या प्रकरणी आता ठेकेदारांवर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौं सपना रोशन भगत यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकसआहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की, अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होते. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते.

या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ८८ येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली. त्यात पाल असल्याचे आढळून आले आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४० पोरांना याचा हळू हळू त्रास जाणवू लागला. याची तात्काळ सूचना ही महापालिकेच्या अधिकाऱ्याने देण्यात आली व महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली. अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत आहे, परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळखेळणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे.

गेल्या दोन महिन्यात दिवा विभागात अनेक घटना घडल्या आहेत. साबेगावात अशीच घटना घडली होती बी. आर. नगर मध्ये पण अशाच प्रकारच्या घटना या वारंवार विभागात घडत आहेत तरी तातडीने या खिचडी देणाऱ्या ठेकेदार यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असे सौं सपना रोशन भगत यांनी म्हटले आहे.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

Read More »

मुख्य जिल्हाधिकारी साहेब मुंबई व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन वतीने ऍक्टिव्हिस्ट राष्ट्रीय व उपाध्यक्ष राजेश माकोडे, आणि मुंबई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सचिन खरात यांच्याकडून पत्र देण्यात आले.

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

error: Content is protected !!
Scroll to Top