एक निर्भीड विश्लेषण – श्री कामेश घाडी
मुंबई प्रतिनिधी:
रुपया पुन्हा कोसळला — जगासमोर भारत आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला.
रुपया खाली… अर्थव्यवस्था खाली… आणि देशाची जागतिक प्रतिमा तळाला.
1 USD = 89.66 रुपये — हा आकडा भारताच्या आर्थिक आरोग्याचा एक्स-रे आहे.
आश्चर्यकारक म्हणजे आज अफगाणिस्तानसारख्या युद्धग्रस्त देशाचे चलन मूल्य भारतापेक्षा जास्त स्थिर आहे.
एकेकाळी मोदींनीच म्हटले होते:
➡️ “जिस देश का रुपया गिरता है, उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता है…”
आज त्याच वक्तव्याचा अर्थ देश स्वतः अनुभवत आहे.
अमेरिकेचे टॅरिफ — भारतीय व्यापाराला मोठा फटका…
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले जड टॅरिफ हे मोठं कारण आहे.
➤ भारतीय निर्यात कमी
➤ व्यापाऱ्यांचे लाखो कोटींचे नुकसान
➤ उत्पादन उद्योगात मंदी
➤ रोजगार घट
भारताने “रणनैतिक मैत्री”च्या नावाखाली कोणती आर्थिक सुरक्षा मिळवली?
भारत जागतिक इंडेक्समध्ये खाली… आणि खालीच जातोय!
खाली काही मुख्य इंडेक्सची अधिकृत आकडेवारी:
1) Human Development Index (HDI)
2024 रँक: 134/193
✴️ भारत 2015 नंतर सतत घसरत आहे.
2) Global Hunger इंडेक्स 2024 रँक: 111/125
✴️ स्थिती “गंभीर” या श्रेणीत.
3) Press Freedom Index
2024 रँक: 159/180
✴️ माध्यमांची स्वातंत्र्य जगातील सर्वात वाईट स्थितीत.
4) Democracy Index (Economist)
2024 रँक: 41/167, श्रेणी: Flawed Democracy
✴️ लोकशाही गुणवत्ता घसरत, संस्थांवर राजकीय नियंत्रण वाढत.
5) Corruption Perception Index (CPI)
2024 रँक: 93/180
✴️ भ्रष्टाचार कमी करण्याऐवजी वाढती आकडेवारी.
6) Global Gender Gap Index
2024 रँक: 127/146
✴️ महिला सुरक्षा आणि सहभागात मोठी घसरण.
7) Environmental Performance Index (EPI)
2024 रँक: 176/180
✴️ पर्यावरण, प्रदूषण नियंत्रणात भारत तळाला.
8) World Happiness Index
2024 रँक: 126/143
✴️ जगातील सर्वात दुःखी देशांच्या यादीत भारत वरच्या (वाईट) क्रमांकावर.प्रत्येक सेक्टरमध्ये भारत मागे — विकास फक्त भाषणात…..
✴️ उद्योग क्षेत्र
उत्पादन ४ वर्षांपासून स्थिर → बेरोजगारी वाढली.
✴️ कृषी क्षेत्र
शेतकरी उत्पन्न वाढले नाही, कर्ज वाढले.
✴️ आरोग्य क्षेत्र
WHO नुसार भारतात आरोग्य सुविधांची कमतरता.
✴️ शिक्षण
70 लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव.
✴️ IT आणि स्टार्टअप्स
गेल्या 18 महिन्यांत 1 लाख IT कर्मचारी बेरोजगार.
विकासाच्या नावाखाली फक्त इव्हेंट, उद्घाटने आणि भाषण — काम मात्र शून्य.कर्जाचा डोंगर — भारत आर्थिकदृष्ट्या गुदमरतो आहे*
वर्ल्ड बँककडून भारत सर्वाधिक कर्ज घेणारा देश भारत आज जगातील सर्वात मोठा कर्जदार देश बनला आहे.
देश कर्जबाजारी होत असताना सरकार फक्त उद्घाटने आणि जाहिरातीवर पैसे उधळत आहे.
भारताने केवळ वर्ल्ड बँकेकडूनच नव्हे तर IMF, ADB इत्यादींकडूनही सर्वाधिक कर्ज घेतले आहे.
➤ भारतावर एकूण कर्ज: 200 लाख कोटींच्या वर
➤ GDP च्या तुलनेत कर्जाचे प्रमाण धोकादायक पातळीवर
➤ वाढत्या कर्जावर फक्त व्याजासाठी हजारो कोटी जातात
कर्ज वाढतंय…
पण देशात काय वाढतंय..?
महागाई, बेरोजगारी, करभार… एवढंच.
राजकारणाची वाताहात – अर्थव्यवस्था विसरली, प्रचारच ध्येय झालं.
रुपयाची घसरण म्हणजे देशाची घसरण — आणि सरकारची जबाबदारी टाळाटाळ
आज राजकीय चर्चा केंद्रे:
✴️ जात, धर्म, ध्रुवीकरण, आणि महापुरुषांच्या नावावर राजकारण
जेथे चर्चा असायला हवी होती:
रोजगार
शिक्षण सुविधा
उत्पादन
आरोग्य सुविधा
रुपयाची स्थिती
व्यापारी संरक्षण
कर्ज नियंत्रण
भ्रष्टाचार थांबवणे
पण नेमके मुद्दे गायब आहेत.
कारण या मुद्द्यांवर बोलले, तर सरकारची जबाबदारी उघडी पडते.
अर्थव्यवस्था ढासळली, रुपया पडला, आणि देश मागे गेला, भारताची स्थिती स्पष्ट आहे:
➤ रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
➤ इंडेक्समध्ये सतत घसरण
➤ परकीय कर्ज वाढ
➤ व्यापार तोटा
➤ बेरोजगारी वाढ
➤ जागतिक प्रतिमा ढासळली
आणि त्यावर पांघरूण घालण्यासाठी फक्त प्रचार, जाहिराती, उद्घाटने, आणि खोट्या आकड्यांचा खेळ.
खरी सुधारणा हवी असेल तर:
वास्तविक आर्थिक धोरण
जागतिक व्यापारात पुनर्स्थापना
इंडेक्स सुधारण्यासाठी कठोर पावले
भ्रष्टाचारावर नियंत्रण
उत्तरदायी नेतृत्व
जाहिराती नाही… कृती लागते.
✍️श्री. कामेश घाडी
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
रिडबुक फाउंडेशन
संपादक : आरटीआय टाइम्स
============================









