प्रत्येक पाचवा मृत शेतकरी, विद्यार्थ्यांचाही समावेश
भारत गेल्या वर्षी कोरोना महामारीला तोंड देत होता तेव्हा देशात १.५३ लाखांपेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली. त्यात १३ टक्के दुर्घटना महाराष्ट्रातील होत्या. राज्यात आत्महत्या केलेल्यांमध्ये दर ५वी व्यक्ती ही शेतीवर अवलंवून होती.
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोकडील ताज्या आकडेवारीनुसार देशात आत्महत्या केलेल्या एकूण १.५३.०५२ जणांत १०.६७७ (७ टक्के) शेतीशी संबंधित होते. शेतीवर उपजीविका करणारे सर्वाधिक ४००६ जण महाराष्ट्राचे होते. त्यात २३२४ जणांची स्वत:ची शेती होती, तर राहिलेले २४३ भूमिहीन शेतकरी आणि १४३९ शेतमजूर होते.
कोरोना काळात आत्महत्या करणान्यात सर्वाधिक वेरोजगारांचा समावेश होता. एकूण १५.६५२ जण वेरोजगार होते. त्यातील सर्वाधिक १८४३ महाराष्ट्रातील होते. त्यानंतर १७६९ आत्महत्या केरळ, १५६६ तामिळनाडू. १३९८ ओडिशा आणि १३५० कर्नाटकातील होत्या.
आत्महत्या करणाऱ्यात २०५७ सरकारी कर्मचारी होते. त्यात सर्वाधिक २९९ महाराष्ट्रातील, २६९ तामिळनाडू. १८१ कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ११२ राजस्थानातील होते.
२०२० मध्ये एकूण १२,५२६ विद्याथ्यांनी आत्महत्या केली. त्या सर्वाधिक १६४८ महाराष्ट्रातील हो १४६९ ओडिशा,११५८ मध्य प्रदेश, ९३ तामिळनाडू आणि ७०४ झारखंडम झाल्या. महाराष्ट्रात कर्जफेड अशक झाल्यामुळे १३४१ जणांनी जीव संपवून घेतले. ७३० जणांनी वैवाहि प्रश्नानी आणि ३६५ जणांनी लग्ना तडजोड न केल्यामुळे आत्महल केली. ८० महिलांसह ९० जणाहुंड्यावरून आत्महत्या केली. १० जणांच्या आत्महत्येचे कार विवाहवाह्य संबंध होते. तलाकमुळे ६१ जणांनी आत्महत्येचा मार्ग धरल महाराष्ट्रात एकूण ३६८४ जणांआजारपणाला त्रासून आत्महल केली. त्यात ३०३ कर्करोग, २८ जणांनी अधोगवायूमुळे तर १३२२ ज मानसिक आजाराला कंटाळले हो २४७९ जणांच्या आत्महत्येचे कार दारूचे व्यसन होते.