रायगड प्रतिनिधी:
रिटघर – पनवेल गावातून बहिष्कृत करणार्यांची फौजदारी न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश ) आरटीआय ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्याम दादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश मौजे रिटघर येथील श्री. महादेव नारायण गायकर हे आई वडिलांसोबत जन्मापासून रिटघर गावचे कायम रहिवासी आहेत. त्यांच्या आई रिटघर गावचे पूर्वीचे मूळ पंच लडकू झावऱ्या भोपी यांची नात व शंकर लडकू भोपी यांची कन्या आहे. त्यांच्या आईचे म्हणजेच मथुरा यांचा विवाह बेलवली गावचे नारायण पदु गायकर यांचे सोबत सन १९५९ साली शंकर लडकू भोपी व भाऊ पुंडलिक शंकर भोपी यांनी करून दिले व मथुरा व नारायण यांना मौजे रिटघर येथे घर व १६ गुंठे जमीन देऊन रिटघर येथेच कायमचे रहिवासी करून घेतले होते व आहे. रिटघर गावामध्ये सन १९७५ साली सार्वजनिक गणेशोत्सव मंडलाची स्थापना श्री. धोंडू लडकू भोपी, श्री. शंकर नागू भोपी, श्री. बालू विठू भोपी, श्री. मुंगा बुधा पाटील, श्री. पुंडलिक शंकर भोपी व गावातील इतर पंचांनी मिळून केली, त्यावेळी रिटघर गावामध्ये एकूण ७५ घरांचा सहभाग होता. त्यामध्ये श्री. नारायण पदु गायकर यांचाही समावेश होता. ते देखील सहन १९५९ पासून गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचे.
त्याचप्रमाणे श्री. महादेव नारायण गायकर हे देखील सज्ञान झाल्यापासून रिटघर गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी आवर्जून सहभागी असतात. सन २००६ साली गावातील पंच मंडळीने गावच्या जमिनीचा व्यवहार एका खरेदीदारा सोबत केला व त्यातून मिळालेला मोबदला गावातील सर्व हिस्सेदारांना वाटला परंतू नारायण पदु गायकर यांना हिस्सा देने डावळले. तसेच महादेव नारायण गायकर यांच्या प्रमाणे रिटघर गावात इतरही लोक येऊन कायमचे स्थायीक झाले आहेत. त्यांना मात्र पंचांनी गावचे ग्रामस्थ म्हणून मान्यता देऊन मोबदला दिलेला आहे. मात्र महादेव नारायण गायकर यांना हेतुपुरस्कार डावळण्यात आले आहे. वास्तविक ज्या जमिनीचा व्यवहार केलेला आहे ती मिलकत येथील पाच लोकांनी विकत घेतलेली मिळकत आहे. त्यामध्ये महादेव गायकर यांच्या आईचे आजोबा लडकू झावऱ्या भोपी व महादेव गायकर यांची पत्नीचे आजोबा शंकर नागू भोपी व इतर ३ यांनी मिळून विकत घेतलेली असतानाही व तिची या रिटघर गावातील काही पंचांनी विक्री केली असतानाही ज्यामध्ये वारसा हक्कानेही हिस्सेदार ठरत असताना कोणताही मोबदला दिलेला नाही. त्याबाबत महादेव नारायण गायकर यांनी कोणतीही तक्रार केलली नाही. असे असून देखील त्यांनी गावातील कार्यक्रमात तु बाहेरील आहेस तुझा गावात कोणता संबंध नाही गणेशउत्सव कार्यक्रमात सेवेमध्ये सहभागी करून घेत नाहीत. त्यामुळे महादेव गायकर यांनी पनवेल तालुकापोलीस स्टेशन मध्ये वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र त्यावर पोलिसांनी या तथाकीत पंचांना आदेश देऊनही त्यांच्या वागण्यात व कृत्तीत बदल केलेला नाही. व महादेव नारायण गायकर यांना गावातून कायमचाच बहिष्कृत करण्याचा डाव सतत घालीत राहिलेले आहेत. परिणामी महादेव नारायण गायकर हे मानसिक त्रासाला कंटाळून महादेव गायकर यांनी आर टी आय ह्यूमन राइट्स, रायगड जिल्हा अध्यक्ष श्याम पाटील व उपाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे यांची भेट घेतली. व त्यांच्या मार्गदर्शना नंतर. कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. सदर केसच कामकाज. वकील हेमंत साळुंखे हे पाहत आहेत.
रिटघर गावातील नव्याने झालेले पंच श्री. बालाराम गणपत पाटील, श्री. कृष्णा राजाराम पाटील, श्री. गनु बाबूराव भोपी, श्री. विष्णु जयराम भगत, श्री. विलास धर्मा भोपी, श्री. नंदकुमार काना भोपी, श्री. गुलाब गणपत भोपी यांच्या विरोधात पनवेल येथील न्यायालयात फौ.चौ.अर्ज क्र. ६९५९/ २०२४ ही केस दाखल केलेली आहे. कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेऊन, त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे हे लक्ष्यात घेऊन पोलिसांना मे. कोर्टाने सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत व अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान महादेव गायकर यांचे असे म्हणणे आहे की, आज मला या लोकांनी बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या माझ्या संपूर्ण कुटुंबालाही ते बहिष्कृत करतील याची भिती माझ्या मनात होती. माझ्या कुटुंबाला भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होवू नये हीच त्या पाठीमागची भावना आहे. असे महादेव गायकर यांनी बोलताना सांगितले.