बँकेतून पैसे वजा होऊनही पोर्टल कडून मिळाली नाही पावती...
नांदेड : आरटीआय एक्टिविस्ट संतोष टोकलवाड द्वारा केंद्र व राज्य सरकार पूर्ण देशात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी निरंतर काम करत आहे, कारण सर्व काम पेपर लेस व्हावे, पण सूचना अधिकार कायद्यानुसार एक मामला समोर आला आहे, ज्यावर आरटीआय कार्यकर्ता संतोष टोकलवड यांच्याद्वारे ऑनलाईन सूचना अधिकार मिळविण्यासाठी पैसा जमा करण्यात आला, त्यांचे पैसे बँकेतून वजा पण झाले, तरीही त्यांना कोणतीही पावती मिळाली नाही तसेच ऑनलाईन पोर्वटवर पैश्याची पूर्ती झालेली दाखवत आहे.
एक्टिविस्ट संतोष टोकलवाड यांनी राज्यसरकारला हे जाब विचारला आहे की, कशा प्रकारे ऑनलाईन पोर्टल वर काम करायचं, या ऑनलाईन सूचना अधिकारावर कसं विश्वास ठेवायचा, यावरूनच संतोष टोकलवड यांनी चंद्रपूर जिल्यातील कोरपना तालुक्यातील परसोडा गावी एक अनधिकृत आरटीओ RTO चोकी आहे आणि ती सर्व अवजड वाहन धरकाकडून पैसे घेत आहेत, एंट्री फी च्या नावाखाली ते का आणि कसे हा भ्रष्टाचार कळविण्यास त्याबद्दलची माहिती मिळविण्यासाठी संतोषजिनी ऑनलाईन अपील केलं, त्यांचे बँकेतून पैसे वजा झाले, पण त्यांना ना पैसे कटल्याची पावती मिळाली, ना ऑनलाईन अपील केलेली पावती मिळाली. आणि हे वारंवार प्रत्येक वेळेस अर्ज करताना दिसून आले तसेच इतरही आरटीआय अर्ज करणाऱ्या जनतेलाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे आरटीआय एक्टिविस्ट संतोषजिनी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे राज्यसरकारचे अधिकारी यांच्याकडे मागणी केली की, या ऑनलाईन सेवाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सामान्य जनतेसाठी सुरळीत करून द्यावे.