प्रतिनिधी मुंबई:
विकासाच्या नावाखाली मुंबईचा श्वास कोंडला जातो.
दिल्लीचं नाव घेतलं की हवा प्रदूषणाचा मुद्दा लगेच समोर येतो. पण आज मुंबईची परिस्थिती वेगळी राहिलेली नाही.
आज मुंबईचा AQI 186 — “Unhealthy” या श्रेणीत आहे.
हा आकडा फक्त आकडा नाही, तो मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर झालेला थेट हल्ला आहे.
❓ मग प्रश्न असा आहे की
➡️ मुंबईत असं काय घडतंय?
➡️ सरकार, महापालिका नेमकं काय करत आहेत?
झाडे तोड — विकास की विनाश?
मुंबईसारख्या महानगरात
• झाडं म्हणजे फक्त हिरवळ नाही
• ती शहराची ऑक्सिजन फॅक्टरी आहे
पण आज
• मेट्रो
• रस्ते
• बिल्डर प्रोजेक्ट
• कार्पोरेट टॉवर्स
यांच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल सुरू आहे.
महापालिका आणि राज्य सरकार
✔️ झाडं तोडायला तत्पर
❌ पण पर्यावरण वाचवायला उदासीन
एक झाड तोडताना दहा लावतो
हे फक्त कागदावरच उरलं आहे.
उद्योगपतींच्या घशात मुंबईची जमीन
आज मुंबईत जे काही घडतंय, ते पाहिलं की प्रश्न पडतो
➡️ मुंबई कोणासाठी आहे?
सामान्य माणसासाठी की उद्योगपतींसाठी?
• मुंबईतील मोकळ्या जमिनी
• मिठागर
• वनजमिनी
• खुली सार्वजनिक ठिकाणं
• घशात घातली जात आहेत उद्योगपतींच्या
• बिल्डर आणि कॉर्पोरेट लॉबीसाठी नियम वाकवले जातात
• पण सामान्य नागरिकासाठी नियम दगडात कोरलेले असतात
हवा खराब झाली
पाणी दूषित झालं
आरोग्य धोक्यात आलं
➡️ तरीही सरकार गप्प!
नाशिकचा तपोवन — धोक्याचा इशारा
आज नाशिकमधील तपोवन
हा मुंबईसाठी भविष्याचा आरसा आहे.
• नदीपात्रात अतिक्रमण
• वृक्षतोड
• सिमेंट-काँक्रीटचा मारा
• पर्यावरणीय नियमांची पायमल्ली
हे सगळं विकास म्हणून मांडलं गेलं
पण प्रत्यक्षात
• निसर्गाचा घात झाला
•पूरस्थिती निर्माण झाली
•पर्यावरणाचा समतोल बिघडला
आज तपोवन, उद्या मुंबई!
六⚕️ आरोग्य कुणासाठी दुय्यम आहे?
AQI वाढतोय
~लहान मुलांचे फुफ्फुस धोक्यात
~वृद्धांचे श्वसनाचे आजार वाढतायत
~ दमा, कॅन्सर, हृदयरोग वाढतायत
❓ पण सरकार कुठे आहे.?
•कोणती ठोस पर्यावरण धोरणं?
•कोणती दीर्घकालीन उपाययोजना?
•कोणती जबाबदारी निश्चित?
उत्तर — शून्य!
वेळ आली आहे प्रश्न विचारण्याची
जर
• विकासामुळे हवा विषारी होत असेल
• झाडं संपत असतील
• जमीन उद्योगपतींच्या घशात जात असेल
• सामान्य माणूस आजारी पडत असेल
तर असा विकास
❌ नको
❌ मान्य नाही
❌ स्वीकारार्ह नाही
• पर्यावरण वाचवणं ही उपकाराची गोष्ट नाही
• ती सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे.
• आज दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणी
हवा नाही — विष श्वासात जात आहे.
जर आत्ताच आवाज उठवला नाही
तर उद्या
• मास्क कायमचा चेहऱ्यावर
• ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल
• आणि सरकार फक्त आकडे सांगत बसेल
• आता तरी जागे व्हा…
• पर्यावरणासाठी लढा…
• कारण हवा विकत घेता येत नाही!
श्री. कामेश घाडी
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट सोसिएशन









