विनामूल्य CCTV प्रशिक्षण वर्गाला भरघोस प्रतिसाद
प्रतिनिधी मुंबई :
स्थानिक तरुणांना तंत्रज्ञानाधारित व्यवसायाकडे वळवण्यासाठी डॉट कॉम्प्युटर एज्युकेशन आणि ओम इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य CCTV Installation & Repairing प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे पूर्ण झाला. या उपक्रमामागे मा. श्री. सचिन खरात सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
प्रशिक्षणाच्या कालावधीत युवकांना CCTV सिस्टिमचे प्रकार, त्याचा वापर, केबल्स, कनेक्टर, कॅमेरे, तसेच DVR–NVR आणि सॉफ्टवेअर सेटअपची प्रॅक्टिकल माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष हाताळणीवर आधारित या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी फक्त शिकणे नव्हे, तर ‘काम करून शिकणे’ ही नवी कार्यपद्धती अनुभवली.
व्यवसायिक दृष्टिकोनातून कस्टमर हँडलिंग, दरपत्रक (Quotation) तयार करणे, केबल क्रिंपिंग, तसेच बाजारात जाऊन विविध पार्ट्सची ओळख कशी करून घ्यावी, याबाबतही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. विकास वराडकर सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उद्योजकतेच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणामुळे परिसरातील युवकांमध्ये स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण झाली आहे.










