April 25, 2024 Thursday
April 25, 2024 Thursday
Home » Economy » Finance » आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा
a
Link Aadhaar Pan now or else pay a fine of 10 thousand

आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा

मुंबई : तुम्ही पुढच्या महिन्याची वाट कशाला बघत आहात. आजच काम उद्यावर टाकणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजूनही आधार पॅन लिंक केलं नसेल तर अजूनही संधी गेली नाही. आताच लिंक करुन घ्या.

31 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचं होईल. तो केवळ एक प्लॅस्टिकचा कागद उरेल. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही आताच आधार पॅन कार्डशी लिंक करुन घ्या. तुम्हाला 1000 रुपये दंड भरून आता ते करता येणार आहे.

31 मार्चनंतर जर तुम्ही पॅनकार्ड लिंक करायला गेलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. आयकर विभागाने सोशल मीडियावर आणि त्यासोबत मोबाईल नंबरवर देखील ग्राहकांना वारंवार आठवण करुन देत आहे. आता या कामासाठी पुढील महिन्याच्या ३१ तारखेपर्यंतच अवधी शिल्लक आहे.

जर तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि हे काम त्वरित पूर्ण करा. कारण जर पॅन बंद झालं तर तुम्ही आयकर भरु शकणार नाही. याशिवाय तुमची बँकेची काही कामं अडू शकतात. त्यामुळे तुम्ही वाट पाहू नका.

 

How to Link Aadhaar to PAN Card

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जूनपासून आधारला पॅनशी लिंक करण्यासाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपयांचा दंड निश्चित केला आहे. प्राप्तिकर कायदा 1961 नुसार पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

 

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक का करावे ?

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केल्यामुळे तुमचे पॅन कार्ड आवश्यक ठिकाणी वापरता येईल. आयकर विभागाला तुमच्या आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवण्यास मदत होते. तुम्ही टॅक्स भरण्यास अपात्र असाल तरीही पॅन कार्ड आधारशी लिंक केले गेले असावे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड वरील नावात स्पेल्लिंगमध्ये बदल असला तरीही पॅन जोडणीत कोणताही अडथळा येत नाही. आयकर विभागाच्या नवीन नियमानुसार पॅन कार्ड आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही केले तर काय होईल?

दिलेल्या मुदतीत जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर वित्त विधेयक २०२१ नुसार तुम्हाला रु. १००० एवढा दंड भरावा लागेल. कोणताही आर्थिक व्यवहार बाबतीत तुमचे कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय तुम्ही आयकर विवरण पत्र Income tax return भरण्यास सक्षम राहणार नाहीत.

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक आहे काय? कसे पहावे? how to check if pan is linked to aadhar

तुमचं पॅन कार्ड अगोदरच आधारशी लिंक आहे की नाही Check Pan – Adhar Link Status पुढीलप्रमाणे तपासता येईल.

• पॅन कार्ड आधार सोबत अगोदरच लिंक आहे हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.

• त्यानंतर, डाव्या बाजूला असणाऱ्या  ‘Link Aadhar’ हा या पर्यायवर क्लीक करा.

•  ‘Link Aadhar’ पर्यायच्या अगदी खाली ‘Click here’ to view status’ वर क्लीक करा.

• त्यानंतर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक टाकून View Link Aadhar Status वर क्लीक करा. 

• तुमचा पॅन आणि आधार लिंक असेल तर कळेल किंवा नसेल लिंक तरीही त्याची माहिती पाहता येईल.

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसे लिंक करायचे? How to link pan card with aadhar card

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तीन पद्धती आहेत. त्यापैकी जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटेल  त्या पद्धतीने तुम्ही Pan – Aadhar Link करू शकता. आधार पॅन लिंक करण्यासाठी तुमचं, पॅन कार्ड, आधारकार्ड सोबत ठेवा. 

१. एसएमएस (SMS) द्वारे

२. ऑनलाईन

३. ऑफलाईन

१. एसएमएस (SMS) द्वारे

तुमच्या मोबाईल फोनद्वारे एक Text मेसेज पाठवून तुम्ही Pan – Aadhar Link करू शकता. त्यासाठी, मेसेज मध्ये जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे,  UIDPAN <SPACE> १२ अंकी आधार कार्ड क्रमांक><SPACE><१० अंकी पॅन कार्ड क्रमांक लिहून ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर तो मेसेज  पाठवायचा आहे.

उदाहरण : UIDPAN 111122223333 AAAPR5555N

२. ऑनलाईन

•.आधार पॅन लिंक करण्यासाठी सर्वप्रथम, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या शासनाच्या संकेतस्थळावर जा.

•. त्यानंतर, डाव्या बाजूला ‘Link Aadhar’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

•. यानंतर, तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. त्यामध्ये, तुमचा पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व आधार कार्ड वर असलेलं नाव भरा. 

•. तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचं जन्मवर्ष नमूद असेल तर ‘I have only year of birth in Aadhaar card’ या पर्यायाला टिक करा. (पूर्ण जन्मतारीख असेल तर टिक करू नका).

•. त्यानंतर कॅपच्या Capta टाकून,  ‘Link Aadhar’ या पर्यायवर क्लीक करा. 

त्यानंतर, एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये, ‘तुमचं पॅन कार्ड आधारकार्ड सोबत यशस्वीरित्या लिंक झालं आहे’ असा मेसेज येईल.

३. ऑफलाईन

आधार सोबत पॅनकार्ड लिंक करण्यासाठी एसएमएस (SMS) द्वारे आणि ऑनलाईन पद्धतीशिवाय ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पॅन कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी PAN सर्विस प्रोवाईडर, NSDL किंवा UTIITSL या सेंटर्स मध्ये जाऊन ‘Annexure – I’ हा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म  सोबत आधारकार्ड ची कॉपी जोडून व इतर डॉकूमेंट्स देऊन आधार सोबत पॅनकार्ड लिंक करता येऊ शकते. हे सेंटर्स त्यांच्या नियोजित दरानुसार शुल्क आकारणी करतात.

शासनाच्या नवीन नियमांनुसार आज किंवा उद्या तुम्हाला पॅन कार्ड आधार सोबत लिंक करावंच लागेल. जर दिलेल्या मुदतीत (३० जून, २०२१) केलं तर अतिरिक्त शुल्का पासून वाचू शकता. पॅन- आधार लिंक करणे ही शासनाची विश्वस

 

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top