प्रतिनिधी मुंबई :
◾️माहितीचा अधिकार (RTI) वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहे.
• केवळ RTI अर्ज केला म्हणून धमकी देणे, दबाव टाकणे किंवा भीती निर्माण करणे हे थेट कायद्याचे उल्लंघन आहे.
⚫कायदेशीर तरतुदी (Legal Provisions)
◼️ IPC कलम 506
▪️जीवे मारण्याची धमकी देणे किंवा गंभीर इजा पोहोचवण्याची धमकी देणे हा गुन्हा आहे
▪️२ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे
⚫ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351
•गुन्हेगारी धमकी (Criminal Intimidation)
• व्यक्ती, प्रतिष्ठा किंवा मालमत्तेला हानी पोहोचवण्याची धमकी देणे दंडनीय गुन्हा आहे.
⚫ IPC कलम 503
• धमकी देण्याची व्याख्या स्पष्ट करणारे कलम
• 503 + 506 अंतर्गत FIR नोंद होऊ शकते.
⚫ धमकी मिळाल्यास त्वरित काय करावे.?
⚫ पोलीस तक्रार (FIR)
•जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित जा
• धमकीची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात द्या
• IPC 503, 506 आणि BNS 351 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची ठाम मागणी करा
⚫ पुरावे सुरक्षित ठेवा
• कॉल रेकॉर्डिंग
• WhatsApp / SMS / सोशल मीडिया मेसेज
• व्हॉईस नोट्स किंवा ई-मेल
• स्क्रीनशॉट्स सुरक्षित ठेवा
◼️ माहिती आयोगाकडे तक्रार
▪️ धमकी देणारा अधिकारी किंवा व्यक्ती असल्यास
▪️ राज्य किंवा केंद्र माहिती आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करा
▪️ RTI अर्जदाराच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेपाची मागणी करा
⚫कायदेशीर सल्ला घ्या.
• अनुभवी वकील
• RTI कार्यकर्ता किंवा आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेची मदत घ्या.
• गरज असल्यास न्यायालयात संरक्षण अर्ज (Protection Petition) दाखल करता येतो
= महाराष्ट्र राज्य माहिती आयोग
•महाराष्ट्रात RTI कार्यकर्त्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध
• गंभीर प्रकरणात आयोग थेट निर्देश देऊ शकतो.
➕जर पोलीसच धमकी देत असतील तर..?
⚫ Police Complaint Authority (PCA)
•वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र तक्रार दाखल करता येते
•पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी आणि कारवाई होऊ शकते
◼️ लेखी तक्रार + पुरावे = मजबूत केस
⚫ अतिरिक्त महत्त्वाचे मुद्दे (Must Know)
✔️ RTI अर्ज केल्यामुळे कोणालाही धमकावता येत नाही
✔️ धमकी देणे म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न
✔️ RTI कार्यकर्त्यांवर हल्ले हे गंभीर सामाजिक गुन्हे आहेत
✔️ गप्प बसणे म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणे
🔲 लक्षात ठेवा.
▪️ माहितीचा अधिकार हा तुमचा हक्क आहे, भीती बाळगू नका!
▪️ धमकीला घाबरू नका – कायदा तुमच्या बाजूने आहे!
⚫ RTI कार्यकर्त्यांनी एकत्र उभे राहणे हीच खरी ताकद आहे.
श्री. कामेश घाडी
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन










