जर आपल्याला पात्र असूनही गॅस सिलेंडर सब्सिडी मिळत नसेल तर याचे मुख्य कारण म्हणजे आपला एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नाही, तसेच लिंक करण्यासाठी आपल्याला जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल
कुणाला मिळते सब्सिडी
ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सब्सिडी दिली जात नाही मात्र ज्यांचे उत्पन्न 10 लाखाहून कमी आहे त्यांना मिळते
किती मिळेल सब्सिडी ?
आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे – तसेच काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे
ईथे करता येणार तक्रार ?
ग्राहकांना 18002333555 या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेता येईल तसेच तक्रार देखील करता येणार
अशाप्रकारे तपासा स्टेटस
● सर्वात आधी mylpg.in/ या लिंक वर जा – नंतर आपला 17 अंकी LPG आयडी आणि मोबाईल नंबर टाका
● त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा – मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका
● आता आपला ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करा – यानंतर ईमेल आयडीवर आलेल्या लिंकवर क्लिक करा
● त्यानंतर mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप-अप संदेशामध्ये सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सब्सिडी ट्रान्सफर पर्याय वर क्लिक करून सब्सिडीचे स्टेटस पाहता येईल
थांबू शकते सबसिडी :
जर एलपीजीवरील सबसिडी मिळत नसेल तर याचे कारण आधार लिंक नसणे हे असू शकते. ज्यांना पती-पत्नीचे मिळून वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा यापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी मिळत नाही.