कायद्यानुसार मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य (युज बाय डेट) दिनांक टाकणे बंधनकारक आहे. तर ग्राहकांनी हा दिनांक पाहूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत. या उद्देशाने एफडीएतर्फे खाद्याचे नमुने घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिठाई विक्रेते खवा, मावा, फरसाण उत्पादक यांच्यातर्फे ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात अन्नपदार्थ, खवा केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा, तसेच त्याची बिले सुरक्षित ठेवावी. प्रत्येक अन्न व्यावसायिकाने त्याच्या विक्री बिलावर नोंदणी क्रमांक टाकावा, पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावेत, स्पेशल बर्फी चा वापर मिठाई बनवण्यासाठी करू नये, आयुक्त शिवाजी देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सणासुदीच्या काळात परवानाधारक विक्रेत्याकडून दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावी. उघड्यावरील किंवा खवा फेरीवाल्याकडून मिठाई किंवा खरेदी करू नये. बंगाली मिठाई आठ ते दहा तासांच्या आत सेवन करावी. मिठाईवर बुरशी करू नये, मिठाईची चव खराब जाणवल्यास सदर मिठाई नष्ट करावी. मिठाई विक्रेत्यांनी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून सण व उत्सव साजरा करावा, असे आवाहन आढळल्यास त्याचे सेवन शिवाजी देसाई यांनी केले आहे.