February 4, 2026 Wednesday
February 4, 2026 Wednesday
Home » Human Rights News » RTI News » KEM रुग्णालयातील साफसफाई कंत्राटात अनियमिततेचा आरोप; RTI माहिती देण्यात दिरंगाईचा मुद्दा ऐरणीवर
a

KEM रुग्णालयातील साफसफाई कंत्राटात अनियमिततेचा आरोप; RTI माहिती देण्यात दिरंगाईचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई | प्रतिनिधी :

मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या KEM रुग्णालयातील साफसफाई कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना, त्या कामातील संभाव्य अनियमितता उघड होऊ नये म्हणून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन चे पदाधिकारी श्री.आदित्य मैराळे यांनी KEM रुग्णालयातील साफसफाई कंत्राटदारास दिलेल्या देयकांबाबत तसेच देयकांच्या पुष्टीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागितली होती. मात्र संबंधित कागदपत्रे उपलब्ध असतानाही जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी स्वाती शिंदे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.

अर्जदारांच्या म्हणण्यानुसार, माहिती देण्याऐवजी सदर अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे वर्ग करून कर्तव्यात कसूर करण्यात आली. यामुळे प्रथम अपील दाखल करण्यात आले. प्रथम अपीलवरील सुनावणी २० जानेवारी २०२६ रोजी पार पडली असून, त्या वेळी १५ दिवसांच्या आत सर्व माहिती साक्षांकित करून देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशानुसार कालमर्यादा संपल्यानंतरही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असा दावा अर्जदारांनी केला आहे.

याबाबत अर्जदारांचे म्हणणे आहे की, “माहिती देण्यास आणखी वेळ लागेल, तसेच माहिती साक्षांकित केली जाणार नाही. राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली तरी काही फरक पडणार नाही,” असे उत्तर संबंधित लोकसेवकाकडून मिळाले.

माहिती अधिकार कायद्यानुसार शासकीय माहिती स्वयंस्फूर्तपणे (Suo Motu) प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना, पदाचा गैरवापर करून अर्जदारास वारंवार हेलपाटे मारण्यास लावले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी राज्य माहिती आयोग तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे अर्जदार आदित्य मैराळे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकारी अथवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top