रायगड प्रतिनिधी :
मागील काही महिन्या पासुन सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर या सावरसाई हद्दी मध्ये सुरु असलेल्या अनधिकृत डांबर प्लॅंट विरुद्ध आक्रमक भूमिका घेत घातक प्रदूषण होणारा अनधिकृत डांबर प्लॅंट बंद करण्यासाठी सबंधीत शासकीय विभाग याना पुराव्या सोबत पत्र व्यवहार करत होत्या परंतु कोणतीही दाद मिळत नसल्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी तयारी करात आहे , ही बाब समजतास अंकिता सोंडकर याना थांबवण्यासाठी सावरसाई हद्दी मधील जवळपास ८० लोकांच्या सह्या घेऊन खोटा तक्रार अर्ज पेण पोलिस ठाण्यात दाखल केला.
सदर अर्ज मध्ये खोटे आरोप करत अंकिता सोंडकर व त्यांच्या पतीचे देखिल नाव टाकण्यात आले होते . सदर अर्ज वर ८० लोकांच्या सह्या व जबाव मात्र ३ लोकांचे नोंदव्यात आले .
सदर खोटा अर्ज दाखल करुन जबाब देणारे १) योगेश सीताराम दिवेकर २) प्रकाश पांडुरंग पडवळ ३) नरेश काशिनाथ चिंबोरे याना वकीला मार्फत नोटिस दिली असून येत्या १५ दिवसात माननीय न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहे व जनहितयाचिकेच्या कागद पत्राची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली असुन लवकरच जनहित याचिका देखील दाखल होईल असे सांगतले.