प्रतिनिधी मुंबई :
भारतामध्ये समाजकारण करणाऱ्या संस्थांना, ट्रस्टांना किंवा एनजीओंना देणगी दिल्याबद्दल केवळ 50% टॅक्स बेनिफिट मिळते. मात्र, नोंदणीकृत राजकीय पक्षांना किंवा निवडणूक ट्रस्टना देणगी दिल्यास त्यावर 100% कर वजावट लागू होते. यामुळे प्रत्यक्ष समाजकार्य करणाऱ्या संस्थांना निधी मिळवणे कठीण झाले आहे आणि राजकीय पक्ष करसवलतीचे प्रमुख साधन बनले आहेत.
• आयकर कायदा कलम 80GGC व 80GGB अंतर्गत व्यक्ती, HUF व कंपन्यांना राजकीय पक्ष/निवडणूक ट्रस्टना दिलेल्या देणग्यांवर 100% कर वजावट मिळते (रोख देणगी वगळून).
• कलम 13A नुसार पक्षांनी वार्षिक लेखापरीक्षण व हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
गंभीर बाबी व गैरप्रकार
• बोगस राजकीय पक्षांची वाढ: देशभरात अनेक पक्ष केवळ करसवलतीसाठी नोंदणीकृत असून निवडणूक न लढवता देणग्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला जात आहे.
• इलेक्ट्रल बॉण्ड्सचा गैरवापर: 2017–18 नंतर मोठ्या कॉर्पोरेट दानांमुळे निधीचा अपारदर्शक प्रवाह वाढला. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत संवैधानिक चिंतेची नोंद घेतली.
• PM CARES Fund: 100% करसवलत असूनही पारदर्शकतेअभावी RTI, लेखापरीक्षण व माहिती प्रकटीकरणावर प्रश्न उपस्थित झाले.
• परदेशी व अप्रत्यक्ष देणग्या: काही प्रकरणांत परदेशी हितसंबंधांद्वारे निधी देऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे संकेत — राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक.
लोकशाहीवरील परिणाम
• भ्रष्टाचाराला चालना व काळ्या पैशाचे वैधिकरण
• समाजसेवी संस्थांवर अन्याय; निधी अभाव जनतेचा लोकशाहीवरील विश्वास ढासळणे
• सत्ताधारी व मोठ्या पक्षांचे वर्चस्व वाढणे
• लहान पक्ष व नवोदित समाजसेवकांसाठी असमतोल स्पर्धा
तातडीच्या उपाययोजना (मागण्या)
- सर्व राजकीय पक्षांचे CAG ऑडिट बंधनकारक करून अहवाल सार्वजनिक करणे.
- राजकीय पक्षांना RTI अंतर्गत “Public Authority” म्हणून समाविष्ट करणे.
- निवडणूक खर्च मर्यादा काटेकोर अंमलबजावणी व डिजिटल ट्रॅकिंग.
- सर्व देणग्या बँकिंग चॅनल्सद्वारेच (कॅश बंदी).
- स्वतंत्र Political Funding Regulatory Authority स्थापन करणे.
- देणगीची वार्षिक वरची मर्यादा ₹10 लाख (व्यक्ती/कंपनी).
- CSR निधी थेट समाजकार्यासाठीच वापरणे.
- बोगस पक्ष, खोटी माहिती व निधी लपवणूक यांवर कठोर फौजदारी कारवाई.
- 100% करसवलतीवर मर्यादा किंवा केवळ पारदर्शक खर्चापुरती सवलत.
- निवडणूक आयोगाला अधिक अधिकार व संसाधने.
- परदेशी देणग्यांवर कडक नियंत्रण.
- PM CARES व तत्सम निधी — सार्वजनिक लेखापरीक्षण, RTI व खर्चाचे तपशील जाहीर करणे.
आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धती
• अमेरिका: FEC मार्फत प्रत्येक देणगीचा ऑनलाईन खुलासा
• यूके: PPERA 2000 अंतर्गत देणगी मर्यादा व सार्वजनिक तपशील
• जर्मनी: राज्य निधीमुळे कॉर्पोरेट अवलंबित्वात घट
श्री. कामेश घाडी
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
संपदक आरटीआय टाइम्स










