पेण प्रतिनिधी : रोहित शिंदे
पनवेल येथे बौद्ध पौर्णिमा करता जाण्यासाठी कृष्णा सोनावणे हे बस ने त्याच्या मुलींसोबत जात असताना एका प्रवाशाने माझ्या लहान मुलीला धक्का लागला त्या प्रवाशा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाशी गावातील कृष्णा सोनावणे गेले असता आरोपी यांचे नातेवाईक यांनी पेण पोलीस ठाण्यातील अंमलदार साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे यांना पैसे देऊन तक्रार दाखल करण्यासाठी बौद्ध समाजाती कृष्णा सोनावणे यांना पैसे घेऊन साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे यांनी अमानुष पणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून आरोपी यांना मोकिट सोडण्यात आले तरी फिर्याद यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण मुळे गेली पंधरा दिवस दवाखान्यात दाखल होते तक्रारदार यांचे पोलिस अशा वागण्याने मन पूर्णपणे खचले असून साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे यावर मारहाणीत व अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
12 मे रोजी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल नसतानाही कृष्णा सोनवणे बौद्ध समाजाच्या माणसाला बेकायदेशीरपणे मारहाण केली होती या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले असताना कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही सदरील हा विषय कृष्णा सोनावणे यांनी पँथर सुशील भाई जाधव पॅंथर नरेश गायकवाड सुफियान मुकादम यांना सांगितल्यानंतर तात्काळ प्रकरणाची दखल घेऊन पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेऊन पेन पोलीस स्टेशन सीनियर पी आय बागुल सर यांना भेटून तपास कुठपर्यंत आला आहे नंतर रायगड जिल्ह्याच्या एसपी मॅडम आचल दलाल यांना सविस्तर सर्व शिष्टमंडलांनी भेट घेऊन झालेला प्रकार हा निंदनीय आहे त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे त्याचं निलंबन झालं पाहिजे त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली एसपी मॅडमनी तात्काळ आदेश काढला प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल चौकशी करून दोन दिवसांमध्ये सर्व रिपोर्ट सादर करून योग्य ती कारवाई करू असा आश्वासन दिल त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांकडून पॅंथर सुशील भाई जाधव यांनी जर गुन्हा दाखल झाला नाही तर अलिबाग या ठिकाणी जनअक्रोशक मोर्चा निघेल याला सर्व जबाबदार पोलीस प्रशासन असेल असा इशारा दिला.