मुंबई प्रतिनिधी : रोहित शिंदे
पेण शहरा मध्ये मागील काही दिवसा पासुन सर्रास पणे अवैद्य गांजा विक्री प्रमाण वाढत आहे पोलिस यंत्रणा देखील बघण्याची भुमिका घेत आहे काही दिवसांपूर्वी पेण शहरा मधील गोळीबार मैदान जवळ राहणऱ्या गणेश चुनारे आठवी मध्ये शिकणऱ्या मुलाची हत्या करण्यात आली होती पोलिस तपासा मध्ये सदर हत्या ही गांज्या सेवना साठी पैसे न दिल्या मुळे झाली होती सदर मुलाची हत्या झाली असताना सुध्दा सदर मोठ्या प्रमाणात अवैद्य गांजा विक्री हि होत आहे ही हत्या झालेल्या गणेश राहणार गोळी बार मैदान येथे तसेच पिर डोंगरी, पाण्याचा टाकी जवळ, फणस डोंगरी हि गांजा विक्रीचे मोठ्या प्रमाणात अडे झाले आहे भागात मोठ्या सर्रास पणे गांजा विक्री होऊन गांजा माफिया मोठ्या प्रमाणात तयार होत जे गांजा माफिया आहे त्यांन वर कारवाई होऊन सुद्धा पुन्हा गांजा विक्री चे व्यवसाय चालू असुन आता तरी पोलिस कारवाई करून तरुण मुलाचे आयुष वाचवणार का ? की अजुन गणेश सारख्या तरुण मुलाचे जीवन उद्धवस्त होण्याची वाट बघत बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरुण मुले चुकीच्या मार्गे जाऊ नये या साठी ॲडव्होकेट नागेश जगताप यांनी पेण पोलिस उप विभागीय अधिकारी याच्या कडे अवैद्य गांजा विक्री विरुद्ध कारवाई करण्या साठी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
सदर तक्रार प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे दाखल करून पेण शहरातील गांजा विक्री वर कारवाई करण्याबाबत कळवले आहे.