प्रतिनिधी मुंबई :
लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप आज गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघटनेच्या मुंबई विभागाच्या वतीने क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम शिशु विकास मंदिर, वाडिया इस्टेट, बैलबाजार, कुर्ला (वेस्ट) येथे संपन्न झाला. तसेच मनीषा ताई मानकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळेतील शिक्षक वृंद, संघटनेचे पदाधिकारी, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
• कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
• सावित्रीबाईंच्या जीवन व कार्यावर चर्चा करताना त्यांचा समाज सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान उलगडण्यात आले.
• लहान मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित विद्यार्थी व पालकांमध्ये आनंद दिसून आला.
• शिक्षक वृंद आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि सावित्रीबाईंच्या विचारांवर मार्गदर्शन केले.
• सामाजिक संदेश:
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सावित्रीबाईंच्या विचारांचा प्रसार करून शिक्षणाची ज्योत अधिकाधिक मुलांच्या जीवनात प्रज्वलित करणे हा होता.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाळेतील शिक्षक वृंद, संघटनेचे पदाधिकारी, आणि सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
या वेळी उपस्तिथ पदाधिकारी
संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष – श्री. दिपक भाऊ खोपकर
प्राचार्य मा. श्री. विलास भाऊ धस
उपाध्यक्ष – श्री सुनिल नेटके
महिला अध्यक्षा – सौ मनीषा ताई ठवाळ
प्रसिद्धी प्रमुख – श्री. सचिन खरात
मुंबई महिला उपाध्यक्षा – सौ मनिषा ताई मानकर
धारावी संघटिका – सौ लक्ष्मीताई डोईफोडे आदी उपस्थित होते
जय सावित्री, जय शिक्षण!