कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनात पारदर्शकतेचा अभाव; उपअधीक्षकांवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाच्या पारदर्शकतेसंदर्भात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय घनश्याम गुप्ता यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आरटीआय ह्यूमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशन’चे (RTI Human Rights Activist Association) कुर्ला तालुका …